शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

माउली आणि जगद्गुरूंच्या दर्शनासाठी रांगा

पंढरपूर- संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या ठेवणत आलेल मंदिरांमध्ये दर्शनासाठी स्थानिक नागरिक व परगावच्या भाविकांनी रांगा लावल्या आहेत. 
 
आळंदी व देहू या तीर्थक्षेत्रातून संतांच्या पादुकांसह जेव्हा या पालख्या निघतात तेव्हा त्यांच्या बरोबर लाखो वारकरी चालत पंढरीत येतात. त्यांना पादुकांचे दर्शन रोजच होत असते पण जे पंढरीतील स्थानिक नागरिक तसेच परगावातून वारीसाठी आलेल्या भाविकांना पंढरीत एकादशी ते पौर्णिमे दरम्यान त्यांचे दर्शन घेता येऊ शकते. द्वादशीर्पतच मोठी गर्दी शहरात असलने नागरिक तेथे पोहचू शकत नाहीत पण आता मात्र संख्या कमी झाल्याने माउली व जगद्गुरूंच दर्शनासाठी रांगा लागल आहेत.
 
दोन्ही पादुका मंदिर प्रदक्षिणा मार्गावर आहेत. येथे दिवसभर दर्शनासाठी लोक येत आहेत. त्याच बरोबर संत गजानन महाराज, मुक्ताई, निवृत्तिनाथ, सोपानदेव, एकनाथ महाराजांसह अन्य संत पालख्यांच्या दर्शनाला भाविक जात आहेत. या पालख्या मंगळवार्पत येथे असणार आहेत. 19 रोजी गोपाळपूरच्या गोपाळकृष्ण मंदिरात काला होणार आहे व त्यानंतर पालख्यांच्या परतीचा प्रवास सुरू होईल.