गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

माउलींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दाखल

पुणे- कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांचा दळभार घेऊन बुधवारी रात्री पुण्यनगरीत दाखल झाला. येथे पालखी सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम असणार आहे.
 
अलंकापुरीचा निरोप घेऊन श्री संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा सकाळी 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाला. ज्ञानराजांची पालखी फुलांनी सुशोभित केलेल्या रथामध्ये विराजमान झाली. रथाला जोडण्यात आलेल्या बैलजोडीने माउलींचा रथ घेऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण केले.