शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (11:12 IST)

माझ्या पराभवाला काँग्रेस जबाबदार : राणे

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतील पराभवाला मीच जबाबदार असल्याचे सांगणार्‍या नारायण राणे यांनी घुमजाव केले असून  या पराभवाला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप 'प्रहार' या वृत्तपत्राच अग्रलेखातून करण्यात आला आहे. प्रहारमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे अनेक नेते हे फक्त चेहरे दाखवपण्यापुरते समोर होते.

काळोख पडल्यावर अनेकांनी अनेक उद्योग केले व त्यामुळे राणे लढले, काँग्रेस हरली अशी स्थिती झाली.