मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मान्सूनचे अंदमानात दमदार आगमन

पुणे- यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार, आठ दिवस उशिरा दाखल होणार अशा बातम्या येत असल्याने संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकर्‍ांना अखेर दिलासा मिळाला आहे. कारण मान्सूनचे ढग दक्षिण अंदमान-निकोबारच्या समुद्रकिनारी मंगळवारी सायंकाळी दाखल झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवडय़ात मान्सून धडकेल, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. मान्सूनच्या आगमनाच्या आशेने दुष्काळग्रस्त जनता सुखवणार आहे.
 
येत्या चार-पाच दिवसात मान्सून अंदमानात दाखल होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने मागील आठवडय़ात व्यक्त केला होता. त्यानुसार मान्सून काल सायंकाळी अंदमानमध्ये दाखल झाला आहे. गेली दोन दिवस श्रीलंकेला जबरदस्त पावसाने झोडपल्याने मान्सूनचा पाऊस भारतातही लवकरच कोसळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.