बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (10:28 IST)

माय मराठीला राजभाषेसाठी ‘प्रतिक्षा’च

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी अर्थान ‘मराठी राजभाषा’ दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता मावळली आहे. यासाठी आता प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
 
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करुन देण्याचा दावा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केला होता. यासाठी जोरदार पाठपुरावाही केला होता मात्र, याला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय विभागांची मंजूरी रखडल्यामुळे या निर्णयाला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.