शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 2 जुलै 2015 (10:40 IST)

मार्डचा संप; रुग्णांचे हाल

वेतनवाढ, सुरक्षा व्यवस्था आदी मागण्यांसाठी मार्डने आजपासून संप पुकारल्याने रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. यावर सरकारने तोडगा न काढल्याने सरकारी रुग्णांलयातील सेवा विस्कळीत होणार आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठक निष्फळ ठरल्याने मार्डने आंदोलनअस्त्र उगारले आहे. वेतनवाढ  मिळावी, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी, ही मार्डची मुख्य मागणी होती. तावडे यांनी या मागण्या मान्य देखील केल्या. मात्र, हे आश्वासन लेखी देण्याची मागणी मार्डच्या पदाधिकाºयांनी केली. मात्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर असल्याने लेखी स्वरुपात आश्वासन देणे शक्य नसल्याचे तावडे यांनी सांगितले.  लेखी आश्वासनावर ठाम असल्याने मार्डने आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.