मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By WD|
Last Modified: रत्नागिरी , सोमवार, 14 एप्रिल 2014 (16:28 IST)

मालगाडीचे डबे घसरले; कोकण रेल्वे ठप्प

संगमेश्वर ते उक्षी स्टेशनदरम्यान मालगाडीचे चार डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे गाडी विचित्र पद्धतीने अडकल्याने पाच डबे कापून काढावे लागणार आहेत" त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी 24 तासांहून अधिक वेळ लागणार असल्याच रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले आहे. कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागणार असल्यामुळे मतदान आणि सुट्ट्यांसाठी कोकणात जात असलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.

मालगाडीचे डबे घसरल्याने सावंतवाडी-दादर पॅसेंजर अरवली स्टेशनवर, मुंबईकडे येणारी दुरांतो एक्स्प्रेस मडगाव स्टेशनवर, राजधानी - कामथे स्टेशनवर, मुंबई-गोवा जनशताब्दी एक्स्प्रेस खेड स्टेशनवर खोळंबल्या आहेत. तर मुंबईकडे येणारी मांडवी एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नाही.