गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (10:48 IST)

मालाडच्या मंगेश विद्यालयात कलादालन-२०१५ स्पर्धा-प्रदर्शनाचे आयोजन

७ ते ९ ऑगस्ट : स्पर्धा आणि १५ ते १६ ऑगस्ट : प्रदर्शन

शालेय विद्यार्थ्यांना कलाजगतातील वैविध्य पूर्ण कला कौशल्याची जवळून ओळख व्हावी, त्यांच्यात कलेची गोडी वाढावी ह्या निमित्ताने मालाड पूर्व च्या मंगेश विद्या मंदिर माजी विद्यार्थी संघाने शाळेत कलादालन-२०१५ स्पर्धा-प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

शुक्रवार, ७ ऑगस्ट ला सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत १ ली ते ४ थी साठी अनुक्रमे मातीकाम, सोपी चित्रकला, पेपर रांगोळी आणि भेटकार्ड बनविणे ह्या स्पर्धा होतील. शनिवार, ८ ऑगस्ट ला सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ५ वी ते १० वी साठी 'प्लास्टिक संकटाशी लढा' ह्या विषयावर कलाकुसर स्पर्धा होईल तर रविवारी ९ ऑगस्ट ला सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांसाठी कलात्मक चित्रकला, कलात्मक कलाकुसर स्पर्धा आणि 'शिक्षणाचे महत्त्व' ह्या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होईल. हि स्पर्धा सर्वांसाठी विनामूल्य असून, स्पर्धा-कलावस्तू ९ ऑगस्ट ला (अंतिम तारीख) दुपारी ४ वाजेपर्यंत शाळेत सुपूर्द करता येवू शकतील.

ह्या स्पर्धेतील निवडक कलाकृतींचे भव्य प्रदर्शन १५ ऑगस्ट ला शाळेच्या सभागृहामध्ये भरवण्यात येईल. तसेच त्या दिवशी स्पर्धेतील विजेत्यांना ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके आणि पारितोषिके देण्यात येतील. शाळेतील दहावी-२०१५  (मराठी व सेमी इंग्लिश) च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करत शाळेची मान पुन्हा एकदा उंचावल्याने माजी विद्याथी संघातर्फे गुणवंतांचे विशेष कौतुक केले जाईल. त्या दिवशी माजी विद्यार्थी संघातर्फे शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या फोटोग्राफीसाठी खास 'कलादालन सेल्फी फोटो कॉर्नर' तयार करण्यात येईल. ह्या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या कलाप्रतिभेला प्रोत्साहन मिळेल तसेच त्यांचा आत्मविश्वासही बळावेल. कलादालन स्पर्धेचे हे तिसरे वर्ष हि यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा, त्यासाठी ८२३७५१८९८६ ह्या वॉट्स अपवर तर