मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (10:50 IST)

मुंबई समुद्राखाली बुडण्याची भीती

पॅरिस: वैज्ञानिक माहिती देणारे ‘जनरल सायन्स’ ने आपल्या रिव्यू रिपोर्टमध्ये भीती व्यक्त केली आहे की, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच पृथ्वीवरील सरासरी २ डिग्री सेल्सियस तापमान वाढले तर समुद्राची पातळी २० फुटांवर म्हणजेच ६ मीटरपर्यंत वाढू शकते. असे झाल्यास मुंबई- कोलकाता या भारतातील शहरांसह जगभरातील २० शहरे समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या तापमान वाढीचा एवढाच अर्थ की आपण पृथ्वीवरील ४४४००० स्क्वेअर मीटर भाग गमावून बसू. यामुळे ३७५ मिलियन लोक बाधित होतील. 


 
हा रिपोर्ट अशा वेळी पुढे आला आहे ज्यावेळी पॅरिसमध्ये (३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर) क्लायमेट चेंज (हवामान बदल परिषद) होत आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील १०० प्रमुख नेते, शेकडो शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. या परिषदेचा उद्देश हा आहे की, जगभर वाढत चालत असलेले सरासरी दोन डिग्री सेल्सियस तापमान कसे कमी करता येईल ते. यूनो प्रथमच हवामान बदलाच्या समस्येला समोर जाण्यासाठी सर्व जागतिक नेत्यांत एकमत करण्यासाठी सरसावली आहे. 
 
मुंबईसह ही आहेत २० शहरे 
शांघाय (चीन), हॉंगकाँग (चीन), तायझोऊ (चीन), मुंबई (भारत), कोलकाता (भारत), तानजिन (चीन), जकार्ता (इंडोनेशिया), नांतोंग (चीन), हो ची मिन सिटी (व्हिएतनाम), ओसाका (जापान), चटगाव (बांगला देश), टोकिओ (जपान), हनोई (व्हिएतनाम), हुआयन (चीन), शांतोऊ (चीन), नाम दिन्ह (व्हिएतनाम), जियागमेन (चीन), खुलना (बांगला देश), बारिसाल (बांगला देश) आणि लियानयुंगैंग (चीन)
 
काय व्यक्त केली आहे भीती ? 
* तापमान वाढल्यास समुद्रपातळी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा धोका गॅस इमिशनपेक्षा अधिक वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. 
 
समुद्र- पातळी वाढल्यास किना-यावरील जमीन पाण्याखाली जाईल. अशावेळी या शहरांच्या किना-यावर वसलेले लोक व मालमत्ता याचा मोठा भाग समुद्राच्या पाण्याखाली जाईल. 
 
चीनला बसेल सर्वाधिक फटका-
जगभरात सर्वाधिक ग्रीन हाउस गॅस उत्पन्न करणा-या चीनमध्ये सर्वाधिक तापमान वाढण्याचा धोका आहे. जगभरात या समस्येमुळे बांधीत होणा-या लोकांत चीनमधील एक चतृतांश लोक असतील.
 
ग्रीन हाउस गॅसच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर असणा-या अमेरिकेलाही मोठे नुकसान होणार आहे.
 
धक्कादायक बाब म्हणजे यातील सर्व शहरे आशिया खंडातील आहेत.