शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:18 IST)

मुंबईच्या मेट्रो-2 आणि मेट्रो-5 ला मंजूरी

मुख्यमंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अधिकार्‍यांची गुरूवारी झालेल्या बैठकीत मुंबईच्या मेट्रो-2 आणि मेट्रो-5 या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी देण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या दोन्ही प्रकल्पांना मंजूरी दिली तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार उड्डाणपूल आणि एका रस्त्यासाठीसुद्धा फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

मेट्रो-2 प्रकल्पामध्ये दहिसर, चारकोप ते मानखूर्द आणि वांद्रे या मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी साधारणपणे 25 हजार 605 कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तसेच मेट्रो-5 प्रकल्पामध्ये वडाळा, घाटकोपर ते ठाणे आणि कासारवाडवली या मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी 19 हजार 57 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.