शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2010 (19:41 IST)

मुंबईत मंगळवारपासून धावणार मोनोरेल

ND
ND
देशातील पहिली मोनोरेल उद्यापासून (मंगळवार ता.२६) मुंबईत धावणार आहे. वडाळा येथील भक्ती पार्कपासून ३०० मीटरपर्यंत ही मोनोरेल धावेल. मुख्यमंत्री अशोक चव्हाण मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून ही मोनोरेल सुरू करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात मोनोरेलचा रॅक मुंबईत आला होता. एकाच ट्रॅकवरून धावणारी ही मोनोरेल वजनाने अत्यंत हलकी असून एका गाडीत ७०० प्रवासी प्रवास करू शकतात. या वर्षअखेर मोनोरेल वडाळा ते संत गाडगे महाराज चौक सुरू होईल. या पहिल्या टप्प्यानंतर दुसर्‍या टप्प्याचे काम सुरू होईल.