शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 21 ऑक्टोबर 2014 (11:54 IST)

मुंबईत स्फोट घडवण्याचा मनसुबा उधळला, इंजिनिअरला अटक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अमेरिकन शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याचा मनसुबा फेसबुकवर व्यक्त करणार्‍या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. अनिस अन्सारी असे आरोपीचे नाव असून तो कुर्ला येथील रहिवासी आहे.
 
सोशल नेटवर्कींग साईट 'फेसबुक'वरील चॅटिंगमध्ये त्याने आपण बीकेसी येथील अमेरिकी शाळेत बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे वक्तव्य केले होते.
 
गेल्या काही काळापासून दहशतवादविरोधी पथकाची अनिसवर नजर होती. एक बनावट फेसबुक अकाऊंट सुरु करून अनिस हा आयएसआयएस या संघटनेच्या कारवाईवर लक्ष ठेऊन होता. आयएसआयएसचे विखारी प्रचार करणारे व्हिडीओही तो सातत्याने पाहात होता.