बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (14:01 IST)

मुंबईतील जोगेश्वरीत गोविंदा पथकाविरुद्ध गुन्हा

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे उल्लघंन केल्याने जोगेश्वरीतील ओम साई राम गणेश गोविंदा पथकाविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. ओम साई राम गणेश गोविंदा पथकाचा आयोजक चेतन खेतले (रा.मेघवाडी) याला पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

दहीहंडीमध्ये 10 वर्षाच्या मुलाला सहभागी केल्याचा चेतन खेतले याच्यावर आरोप आहे.

जोगेश्वरी पूर्व येथील महाराज भवन मंडळाची दहीहंडी फोडण्यासाठी मंडळाने सुमित खारवार या 10 वर्षाच्या मुलाला सहभागी केले होते. 
 
सुप्रीम कोर्टाने 12 वर्षांखालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी न करण्याचे निर्देश दिले होते. मुंबईसह ठाण्यातील बहुतेक दहीहंडी मंडळांनी कोर्टाच्या निर्देशांचे उल्लंघन केले होते.

त्यांच्यावर कारवाई हो‍ईल का? असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे.