मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 18 एप्रिल 2016 (16:11 IST)

मुख्यमंत्र्यांचं वजन कमी!

उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने 18 महिन्यात तब्बल 108 किलो वजन कमी केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 
 
आता मुख्यमंत्र्यांनीही तीन महिन्यात 18 किलो वजन कमी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात डॉक्टरांशी संपर्क साधला होता आणि फेब्रुवारीमध्ये उपचाराला सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच वजन 122  किलो होतं. मात्र फक्त तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी 18  किलो वजन कमी करुन आता 104 किलोवर आणलं आहे. फडणवीस वजन घटवण्यासाठी मेटाबॉलिकचा उपचार घेत आहेत. यामध्ये औषधांसोबतच त्यांच्या शरीराला योग्य आहार आणि पथ्य पाळावी लागत आहेत.