बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 ऑक्टोबर 2016 (22:56 IST)

मुलांच्या जीवाशी खेळ... आणखी किती दिवस?

शालेय मुलांच्या पोषण आहारात मृत बेडुक सापडल्याची घटना वाशिम येथे घडली. शिऱ्याच्या बंद पाकिटात मृत बेडूक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. यामुळे शालेय मुलांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आधी बुरशी, ब्लेड आणि आता बेडूक हाच का पोषण आहार? असा संतप्त सवाल आता राज्यातील जनता करत आहे. 
 
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून नवीन नवीन विषय याठिकाणी समोर येत आहेत, याचा अर्थ पोषण आहार हा आता बालकांना पोषण करण्यासाठी नसून त्यांना आणखीन वेगळ्या पद्धतीने त्रास होण्यासाठी आहे, असे मुंडे यांनी म्हंटले आहे. याला पूर्णपणाने महिला व बालकल्याण विभाग, त्या विभागाचे अधिकारी आणि मंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.