बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (18:05 IST)

मुलाने केला आईचा अमानुष छळ

हे सध्या कलयुग आहे का असा प्रश्न पडावा अश्या घटना सध्या घडताना दिसत आहेत. सासू-सुनेचे भांडण आपण ऐकले पाहिले आहे. घरातील भांडणे आपण पाहिले आहे. मात्र जो मुलगा मिळावा म्हणून देवाला साकडे घातले जाते तोच जीवावर उठला तर हो असे झाले आहे. मायानगरी मुंबई येथे. एका पुत्राने त्याचा आईचा इतका छळ केला आहे की आपण कल्पना करू शकत नाही.

या अत्याचाराचा व्हिडीओ महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या हाती लागला आहे. त्यांनी तो पोलिसांना दिला आहे. या मध्ये  धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ पीडित वृद्धेची सून, मुलगी आणि नातीने काढला असून रेकॉर्डिंग करताना त्यांच्या हसण्याचा आवाजही येत आहे.वृद्धेवरील अत्याचार किती भीषण होते हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. नराधम मुलगा ओढणी पंख्याला बांधून, ती आईच्या पायात अडकवून तिला ओढत असे.हा सैतान मुलगा मागील तीन वर्षांपासून आईचा अमानुष छळ करत असल्याचं समोर आलं आहे.

या धक्कादायक प्रकारात सुरेंद्रला वैद्य  मदत करणारी त्याची पत्नी आणि बहिणीविरोधातही डीएननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा सुरेंद्र, बहु आणि मुलीविरोधात भारतीय दंडविधान कलम  354, 352, 336, 506 (2अ), 504 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.