शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 24 एप्रिल 2015 (15:40 IST)

मॉडेलचा पोलिसांकडून विनयभंग

हॉटेलमध्ये ऑडिशनसाठी गेलेल्या एका मॉडेलला पोलिस चौकीत आणून तिचा विनयभंग केल्याची तक्रार सबंधित मॉडेलने केली असून या प्रकरणी दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकासह हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. 
 
सबंधित मॉडेल एका मोठ्या हॉटेलमध्ये ऑडिशनसाठी गेली होती. तेथून परतत असताना पोलिसांनी चौकशी करत तिला गाडीत बसविले. तेथून चौकीत आणून तिचा विनयभंग केला. तेथून सुटका करण्यासाठी तिच्याकडे साडेचार लाख रुपयांची मागणी केल्याचीही तक्रार मॉडेलने केली आहे.
 
दरम्यान, मॉडेलने मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर सबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर लैंगिक अत्याचारासह खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात येऊन सहा जणांना अटक करण्यात आली आहे.