शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (13:01 IST)

मोदी सरकारला काँग्रेसचे 21 सवाल

काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा हल्लासं 
 
भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी सरकारला अडचणीचे असणारे तब्बल एकवीस सवाल उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे.
 
येथे पत्रकार परिषदेत बोलताना गाडगीळ म्हणाले की, निवडणूक काळात गेल्या दहा वर्षात यूपीए सरकारने काहीही केले नाही म्हणून टीका करणारे मोदी पंतप्रधान म्हणून भूतानला गेल्यावर गेल्या दहा वर्षातील भारत सरकारच्या कामगिरीचे गोडवे गात होते यातले खरे दी कोणते सङ्कजायचे, निर्भया प्रकरणाचा उल्लेख छोटी घटना असा करणार्‍या अरुण जेटलींच्या घरापुढे सुषमा स्वराज, स्मृती इराणी व हेमामालिनी या मेणबत्या लावण्यासाठी कधी जाणार, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला म्हणून गळा काढणारे दी स्वत: मात्र राष्ट्रपतींच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार कसा काय घालू शकतात, न्यायालयासह सार्‍याच घटनात्मक पदांची अवहेलना मोदी सरकार करीत आहे त्यावर भाजपचे काय म्हणणे आहे असे अनेक सवाल गाडगीळ यांनी उपस्थित केले आहेत.
 
पाकिस्तान, चीन अशा परराष्ट्रांबरोबरची मोदींची वागणूक (पान सहा पाहा) दुय्यमीपणाचीत आहे असा आरोप करून गाडगीळ म्हणाले की, जैतापूरच्या प्रशासनावर रान उठवू पाहणारे सारे वाग आता म्याऊ का करत आहेत अशा शब्दात शिवसेनेलाही डिवचण्याचे काम केले आहे. स्मृती इराणींच्या शिक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित  करनू गाडगीळ म्हणाले की, अद्याप त्यांच्यावर कारवाई का होत नाही तसेच ज्या जनरल व्ही. के. सिंह यांच्याविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले त्याच जनरल सिंह यांना मंत्रिमंडळात मात्र कायम कसे काय ठेवले जाते. राजस्थान, मध्यप्रदेश आणि गोवा या भाजपशासित राज्यातील घोटाळ्यांवरही गाडगीळ यांनी यावेळी कडक टीक करीत भाजपला संशयाच्या घेर्‍यात घेतले आहे. 
 
दरम्यान, अनंत गाडगीळ यांनी काँग्रेस प्रवक्तापदाची दहा वर्षे सध्या पूर्ण केली असून दीर्घकाळ प्रवक्तेपद सांभळणारे ते एकमेव काँग्रेस प्रवक्ते ठरले आहेत. त्यांचे वडील कै. विठ्ठलराव गाडगीळ हेही दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्तेपद एक तपापर्यंत सांभाळत होते.