गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (10:50 IST)

यंदा पाऊस ‘बक्कळ’ बरसणार

यंदा समस्त राज्यातील बळीराजासाठी ‘गुडन्यूज’ आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे बक्कळ पाऊस घेऊनच येणार आहेत. पावसासाठी हवामानाची स्थिती उत्तम असून यंदा पावसाळ्यास लवकरच सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
सध्याची हवानामाची स्थिती मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातही कायम राहिल्यास यंदा महाराष्ट्रासह देशात वेळेच्या आधी मान्सून दाखल होईल आणि विशेष म्हणजे तो समाधानकारक असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे गतवर्षी चक्रीवादळे, गारपीट झाली होती. या सर्व गोष्टी मान्सूनला मारक होत्या. यंदा आॅगस्ट ते डिसेंबरच नव्हे तर जानेवारी महिन्यात सुद्धा एकही चक्रीवादळ किंवा गारपीट झालेली नाही.  हवामान हे आदर्श असून ते मान्सूनचे वारे निर्माण होण्यासाठी उपयुक्त आहे.