शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 23 जुलै 2014 (14:08 IST)

राज ठाकरे यांनी उडवली पंतप्रधान मोदींची खिल्ली

वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडाल्याची माहिती समोर आली आहे.राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित होते. यावेळी राज ठाकरे यांनी पती-पत्नीमधील एक संवाद सांगून नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली.
 
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्ष तयारीला लागले आहे. त्यात मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे युवा संघटनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे देखील सक्रीय राजकारणात प्रवेश करत असल्याचे समजते. पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. 
 
राज ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांची लाट संपुष्टात आली आहे. तसेच जो सोशल मी‍डिया नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करत होता. आता तोच मोदींच्या विरोधात लिहितो आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सजग राहण्याचा सूचनाही राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.