गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: ठाणे , मंगळवार, 11 ऑगस्ट 2015 (11:26 IST)

राज यांचा पुन्हा ‘भैय्या राग’

मराठी राजभाषा आहे, हे ५५ वर्षांनतर सरकारला कळाले. मुंबई ठाण्यात रिक्षा चालकांसाठी नविन परमिट दिली जात असल्याचे मराठी तरुणांना माहितच नाही. यात केवळ ६० टक्के उत्तर भारतीय तर ३० ते ४० टक्के बांग्लादेशी आहेत. यांना पोसायचे काम भाजपावालेच करीत आहेत, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. 
 
 
गडकरी रंगायतन येथे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या गदीर्ने खचाखच भरलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, याकूब मेमनला फाशी द्यायला २२ वर्षे लागली. सर्वसामान्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात, याकूबसाठी पहाटे तीन वाजता सर्वोच्च न्यायालय सुनावणीला बसतात. याकूबच्या सुनावणीला २२ वर्षे आणि गणेशोत्सवातील मंडप आणि डिजेचा निर्णय एकदम झटकन? दहीहंडी म्हणे फक्त २० फूटापर्यंत बांधायची. मग ती घरातच फोडायची का, असे सवाल करुन न्यायालयांच्या निर्णयांवर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली.