शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (11:04 IST)

राज्यपाल देणार भाजपला आमंत्रण?

गेल्या नऊ महिन्यांपासून राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या दिल्लीत पुन्हा एकदा सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून राज्यपाल नजीब जंग सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार बनवण्यासाठी पाचारण करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा बरखास्तीसाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरही आज सुनावणी झाली. सर्वोच्च नालाने लोकशाहीची जाग राष्ट्रपती राजवट घेऊ शकत नाही, असा निकाल दिला आहे.
 
दिल्ली विधानसभेत भाजप हा 28 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाला सरकार स्थापनेची संधी देण्याची शिङ्खारस राज्यपालांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती. ही शिङ्खारस राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानेच दिल्लीला नवे सरकार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज, बुधवारी ते भाजपला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण देऊ शकतात, असे सूत्रांनी स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना भाजपनेही दिल्लीत आपले सरकार स्थापन होणार, असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.