शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (17:21 IST)

राज्यातील विद्यापीठाकडून सर्वाधिक पीएचडी

गेल्या १६ वर्षांत देशभरातील ७४0 मान्यताप्राप्त विद्यापीठांतून केवळ ६६ उद्योजकतेतील पी. एचडी देण्यात आल्या आहेत. तसेच २0,२७१ पी.एचडी सामाजिक शास्त्रात देण्यात आल्या आहेत, तर केवळ १७७ पीएचडी उद्योजकतेत झाल्या. या कालावधीत महाराष्ट्रातील विद्यापीठांतून २५ प्रबंधांसह जास्त संख्येने पीएचडी देण्यात आल्या. यानंतर कर्नाटकात १८ आणि मध्य प्रदेशमध्ये १५ आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणात प्रत्येकी १२ पीएचडी देण्यात आल्या आहे.
 
'स्टडी ऑफ एंटरप्रेन्युअल रिसर्च अँड डॉक्टरल डिसर्टेशन्स इन इंडियन युनिव्हर्सिटीज' या शीर्षकाअंतर्गत गणपती बट्ठीनी आणि डॉ. कविता सक्सेना यांच्या एंटरप्रेन्युअशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (ईडीआयआय) मध्ये यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ईडीआयआय ही एक उद्योजकतेतील शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि सांस्थिक उभारणी यांच्यासाठीची राष्ट्रीय स्रोत असलेली संस्था आहे. गेल्या १६ वर्षांत उद्योजकतेवरील संशोधनातील प्रवृत्ती आणि दिशा या घटकांचा यात अभ्यास आहे.  यात १७७ पैकी डॉक्टरल प्रबंधांपैकी १0४ प्रबंध पुरुष संशोधकांचे आहेत आणि उर्वरित ७३ प्रबंधक महिलांनी लिहिलेले आहेत. १६७ प्रबंधांसाठी इंग्रजीला प्राधान्य दिलेले आहे आणि उर्वरित १0 प्रबंध हिंदीतील आहेत. या कालावधीमध्ये जास्त संख्येने महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये उद्योजकतेत २५ पीएचडी केली आहे. तर ७४0 मान्यताप्राप्त विद्यापीठांतील उद्योजकतेतील केवळ ६६ पी.एचडी देण्यात आल्या आहेत. ५९ टक्के उद्योजकतेतील संशोधन पुरुष संशोधकांकडून झाले आहे.