शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई/ठाणे , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (11:13 IST)

राम कदमांना सिने अभिनेत्री बिपाशाने बांधली राखी!

मुंबईत दहीहंडी उत्सवाला उधाण आले आहे. सोमवारी दुपारी मुंबईत पहिली दहीहंडी फुटली. दादर पूर्वमधली माधववाडीची हंडी फुटली आणि गोपाळांनी एकच जल्लोष केला. दुसरीकडे मनसेचे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडीत सेलिब्रेटींची मांदियाळी दिसली. सिने अभिनेत्री बिपाशा बसुने राम कदम यांच्या हातावर राखी बांधली. चक्की पांडे सोबत तिने ठुमकेही लगावले. 
  
दरम्यान, मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीनिम‍ित्त गोंविंदा पथक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दहीहंडी उत्सवाला यंदा वादाची किनार असली तरी मोठ्या प्रमाणावर दहीहंड्यांचा थरार पाहावयास मिळत आहे.
 
बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश आणि हायकोर्टाचे आदेश तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देशांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे. 
 
दरम्यान, बाल हक्क आयोगाने 12 वर्षांखालील गोविंदांना या उत्सवात सहभागी होण्यापासून मनाई केली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने काही सुरक्षेचे नियम घालून दिले आहेत. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी डीजेंच्या आवाजावरही 65 डेसिबलची मर्यादा घालण्यात आली आहे.
 
अभिनेता गोविंदा, बिपाशा बासू, चंक्की पांडे, अनिल कपूर, बोमण इराणी, ईशा कोपीकर, माधुरी दिक्षितने हजेरी लावली.