गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रायगड , सोमवार, 6 जून 2016 (10:37 IST)

रायगडावर शिवराज्याभिषेकदिन

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 342वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहं. हजारो शिवभक्त गेल्या दोन दिवसांपासून रायगडावर दाखल झाले आहेत. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने सोहळ्यानिमित्त मेघडंबरीतील शिवछत्रपतींचा पुतळा, होळीच्या माळावरील शिर्काई मंदिराबरोबरच गडाची स्वच्छता करण्यात आली आहे.

कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेकाचा सोहाळा साजरा होणार असून यासाठी शुक्रवारीच कोल्हापूर हायकर्सची एक तुकडी जलकुंभासह गडावर दाखल झाली. तर शिवधनुष्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवनेरीहून पालखी घेऊन गडावर दाखल झाले आहेत. आज पहाटे साडे पाच वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर सकाळी दहा वाजता मुख्य राज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होईल. त्यानंतर छत्रपती राजघराण्याच्या राजपुरोहिताच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेक सोहळा पार पडेल.