शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2016 (11:10 IST)

लेखकांचे अधिकार चर्चासत्र आणि व्याख्यान

*प्रबोधक नाट्यवलय* तर्फे आयोजित *"एकांकिका लेखन स्पर्धेचा"* पारितोषिक वितरण सोहळा, शनिवार, दिनांक *१७ सप्टेंबर २०१६* रोजी, *अस्मिता विद्यालय, जोगेश्वरी पूर्व* येथे *दुपारी २.००-५.००* या वेळेत आयोजित केला आहे.
 
या वेळेस, पारितोषिक वितरण सोहळ्याबरोबरच, *"लेखकांचे अधिकार"* या विषयावर, व्याख्यान आणि परिसंवाद आयोजित केला आहे. 
*जाहिरात, हिंदी मराठी नाटक-मालिका आणि चित्रपट आणि कादंबरी अशा विविध माध्यमातील पाच नामांकित अनुभवी लेखक लेखन आणि लेखकांचे अधिकार या विषयावर आपली मते आणि अनुभव मांडणार असल्याने लेखकांनी विशेषत: नवोदित लेखकांनी आवर्जून उपस्थित राहावे....
 
*सदर कार्यक्रम, संस्कार भारती, कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रबोधक प्रकाशित "स्वप्नदोष" या गुप्तहेरकथेचे प्रकाशन माननीय अध्यक्षांच्या हस्ते होईल.
 
*सर्व रसिकांना-लेखकांना या कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण आहे.
 
*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री शामराव जोशी भूषवतील. श्री. शामराव जोशी हे नाट्य, भाषाशास्त्र आणि संवाद क्षेत्रातील तज्ज्ञ असून, सेन्सॉर बोर्ड, नाटक विभाग याचे सन्माननीय सदस्य आहेत.
*कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल:
 
*१. प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा उद्देश्य- 
_श्री हर्षद माने, अध्यक्ष प्रबोधक_
२. *प्रबोधक
* प्रकाशित- 
*"स्वप्नदोष"
* या गुप्तहेरकथा पुस्तकाचे प्रकाशन
३. "लेखकांचे अधिकार"
३. १. व्याख्यान: बौद्धिक संपदा कायदा, न्यायालयीन केसेस आणि लेखकांनी घ्यावयाची काळजी
_- एडव्होकेट श्री दीपक परमार, वकील, उच्च न्यायालय_
३.२. परिसंवाद: "लेखकांचे अधिकार"
*सन्माननीय प्रवक्ते:*
आकाश आदित्य लामा- हिंदी मालिका-नाट्य लेखक
अभिराम भडकमकर- मराठी मालिका आणि नाट्य लेखक
मनिषा कोरडे- हिंदी चित्रपट पटकथा आणि संवाद लेखिका
जयराज साळगावकर- मराठी कादंबरी लेखक
विश्वास सोहनी- नाट्य दिग्दर्शक आणि कलाकार
सूत्रसंचालन: अनघा मोडक
४. एकांकिका स्पर्धेचे सन्माननीय परीक्षक श्री संभाजी सावंत आणि श्री आबा पेडणेकर यांचे मार्गदर्शन
५. पारितोषिक वितरण समारोह
६. डॉ शिरीष ठाकूर, संस्कार भारती, मनोगत
७. अध्यक्षीय भाषण: श्री शामराव जोशी-"नाटकांच्या आठवणी"
८. आभारप्रदर्शन
*_सर्व रसिकांना-लेखकांना या कार्यक्रमासाठी पुन:श्च आग्रहाचे निमंत्रण!
*
*निमंत्रक*
प्रबोधक आणि संस्कार भारती कोकण प्रांत.