मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 जून 2015 (11:04 IST)

लोकल अपघातातील दोषी कर्मचार्यांचे निलंबन

चर्चगेट रेल्वे स्थानकावर  बफर तोडून फलाटावर चढलेल्या लोकल अपघातातील दोषी कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे.रविवारी सकाळी घडलेल्या या अपघातात एका महिलेसह पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
 
ब्रेकमधील बिघाड अथवा मोटरमनच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा, असा रेल्वे प्रशासनाचा अंदाज असून या प्रकरणी मोटरमनसह गार्ड आणि लोको इन्स्पेक्टरला पश्चिम रेल्वेने निलंबित करण्यात आले आहे.
 
या लोकलने चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर प्रवेश केला होता. मात्र स्थानकात प्रवेश केल्यानंतर ती अचानक बफरवर आदळली आणि बफर तोडून या लोकलचा पहिला डबा तब्बल पंधरा फूट उंच उडून खाली आदळला. यात मोटरमनच्या केबिनचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.