गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2015 (12:11 IST)

वडिलांना अग्नि दिल्यानंतर तिने दिला बारावीचा पेपर

आई गेल्यानंतर वडिलांनीही अंथरुण धरले. बारावीची परीक्षा तोंडावर आलेली... वडिलांची सेवा करुन तिने अभ्यास केला. परीक्षा सुरु झाली आणि दुसरा पेपर दिल्यानंतर वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पोरके झालेली ती कोसळली नाही. मनाचा निर्धार केला. वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि या अग्निपरीक्षेनंतर ती बारावीच्या परीक्षेला सामोरे गेली.
 
श्रद्धा मनोज कदम असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर बारावीचा दुसरा पेपर दिला आणि लगेचच वडिलांचे निधन झाले. बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास वडिलांचे निधन झाले. गुरुवार सकाळी साडे नऊ वाजता श्रद्धाने वडिलांना मांजरी गावातील स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला व ११ वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाली. तिच्या या धैर्याचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी कौतूक केलेच शिवाय तिला आधार देण्यासाठी शेकडो हात आता पुढे आले आहेत.