शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पनवेल , बुधवार, 25 फेब्रुवारी 2015 (11:18 IST)

वर्गातून उडी मारुन विद्यार्थ्याची आत्महत्या

वर्गातून चौथ्या मजल्यावरुन उडी मारून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना पनवेलमधील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर सबंधित विद्यार्थ्यांने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. गौरव कंक असे त्याचे नाव असून तो सहावीत शिकत होता.
 
दरम्यान, हा प्रकाराची माहिती मिळाल्यावर गौरवचे नातेवाईक व इतर विद्यार्थ्यांचे पालक शाळेत आले. याबाबत काहीही सांगण्यास शाळा प्रशासनाने नकार दिला.  मुलाच्या मृत्यूस मारहाण करणारी शिक्षिकाच जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलिसांनी शाळेवर गुन्हा नोंदविला आहे.