गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: सोलापूर , गुरूवार, 31 जुलै 2014 (11:14 IST)

विधानसभा निवडणूक : मतदारसंख्या 71 हजारांनी वाढली

आज अंतिम यादी प्रसिध्द होणार
 
विधानसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी आज (गुरुवारी) प्रसिध्द होणार असून लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांच्या संख्येत 71 हजारांनी वाढ झाल्याने जिल्हय़ातील मतदारांचा आकडा 31 लाख 69 हजार 940 इतका झाला आहे. 
 
विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख 31 जुलै होती. त्यानुसार गुरुवारी मतदार यादी प्रसिध्द करण्यात  येणार आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ाची मतदार संख्या ही 30 लाख 99 हजार 337 इतकी होती. जून महिन्यात राबविण्यात आलेल्या अभियानामुळे  यामध्ये 71 हजार 242 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ाची एकूण मतदारसंख्या 31 लाख 69 हजार 940 इतकी झाली आहे. यामध्ये 16 लाख 71 हजार 130 पुरुष तर 14 लाख 98 हजार 810 महिला मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ही कमी आहे. सर्वात जास्त 3 लाख 28 हजार 703 मतदार हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आहेत तर सर्वात कमी 2 लाख 68 हजार 503 मतदार हे सांगोला मतदारसंघात आहेत. जिल्हय़ातील सर्व 3290 मतदान केंद्रे, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कर्यालयात मतदार यादी पाहता येणार आहे. 
 
दरम्यान, ज्या नागरिकांनी नाव नोंदवूनही मतदार यादीत त्यांचे नाव नसेल त्यांनी त्वरित तहसील कर्यालयात संपर्क साधावा. ज्या   नागरिकांनी अद्यापही मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही त्यांनी 1 ऑगस्टपासून नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी केले आहे