शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (10:00 IST)

विमानतळांसह ’ताज’ला हाय अँलर्ट

मुंबई- मुंबईच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतरागत विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून हाय अँलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर गेट वे ऑफ इंडिया येथील ताज हॉटेलची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
 
ताज हॉटेलसह विमानतळांवर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा निनावी फोन सोमवारी रात्री विमानतळाच्या मॅनेजरला आला. विमानतळ आणि ताज हॉटेलच्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेल्या गाड्या असल्याचा इशारा निनावी फोनवरून देण्यात आला. या नंतर सर्व ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन एक अफवा असल्याचा संशय पोलिसांना वाटतोय. पण मुंबईतील 7/11 रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेच्या दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कुठलीही कुचराई न बाळगता धमकी दिलेल्या सर्व ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच तिन्ही ठिकाणी बॉम्ब स्कॉडही नेमण्यात आलेत.