गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (11:15 IST)

विरोधात बसण्याचा शिवसेनेचा सूर

हिवाळी अधिवेशनात विरोधातच बसणार असे  शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राऊत  म्हणाले, विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयावर  शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कायम असून  नागपुरातील हिवाळ‍ी अधिवेशनातही  आम्ही विरोधी  भूमिकेतच राहाणार आहेत. 
 
राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारमध्ये सामील  होण्यावर उभय पक्षांत बोलणी सुरु असल्याची आपल्याला  माहिती नसल्याचे सांगून राऊत यांनी शिवसेना आणि  भाजप पुन्हा युती करतील काय? या प्रश्नाला बगल  दिली.
 
येत्या 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु  होत आहे. यापूर्वी होणार्‍या सरकारच्या मंत्रिमंडळ  विस्तारातील शिवसेनेच्या सहभागाबाबत संभ्रम निर्माण  झाला आहे. 
 
राज्यात दुष्काळ, वीज, पाणी आणि कायदा व   सुव्यवस्थेच्या प्रश्नांनी राज्याला ग्रासले आहे. विरोधी पक्ष  म्हणून शिवसेन या मुद्यांवर येत्या अधिवेशना त आम्ही  विरोधकाची भूमिका पार पाडणार असल्याचे राऊत यांनी  सांगितले आहे.