शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

वैशालीला विश्वविजेती होण्याची संधी

आज महाअंतीमफेरी

WD
जगभरात प्रसिध्द झालेल्या 'झी सारेगमप चॅलेंज २००९' या संगीताच्या विश्वयुध्दाची महाअंतीमफेरी आज मुंबईतील गेट ऑफ इंडियासमोर होत असून महाराष्ट्राची महागायिका, रॉक घराण्याची वैशाली भैसने- माडे विश्वविजेती होण्यासाठी महाराष्ट्रातून प्रार्थना केली जात आहे. या विश्वयुध्दामध्ये वैशालीची टक्कर यशिता यशपाल आणि बंगालचा शॉमिक याच्याशी आहे

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि दीपिका पादूकोणसह अनेक कलाकारांच्या उपस्थितीत अंतीमफेरी होणार आहे.

झी टीव्ही वरील सारेगमप हा रिएलिटी शो सध्या सर्वांधीक लोकप्रिय आहे. मराठी सारेगम स्पर्धेतून महाराष्ट्राची माहागायिका बनलेल्या वैशाली माडेची थेट 'झी सारेगमप चॅलेंज २००९' या हिंदी गाण्यांच्या स्पर्धेत झाली. अमरावती जिल्ह्यातील खारतळे या छोट्याशा गावातून आलेल्या वैशालीने भारतच नव्हे तर 65 देशांतील संगीतरसिकांवर आपल्या सुरांची मोहिनी घातली आणि बघताबघता ती लोकप्रिय झाली.

तिला व्होट देण्याचे आवाहन करण्यासाठी ठाण्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात अनिल कपूर, या कार्यक्रमातील तिचे गुरू हिमेश रेशमिया तसेच यापूर्वीच्या स्पर्धकांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता अंतीम फेरीत तिच बाजी मारणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज (शनिवारी) रात्री मुंबईत महअंतीमफेरी होत आहे. या फेरीला दहशतवादाविरूद्दची लढाई असा रोख देऊन चक्क गेट ऑफ इंडियासमोरच भव्य स्टेज उभारण्यात आल्याने प्रेक्षकांनीही त्यास प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

वेबदुनियाच्यावतीने वैशालीला 'बेस्ट ऑफ लक'