गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 26 जुलै 2016 (10:35 IST)

शिवसेना सत्तेतून पाठिंबा काढून घेईल : उद्धव ठाकरे

संतप्त आमदारांच्या प्रतिक्रियेनंतर सत्तेतून पाठिंबा काढून घेण्याचे संकेत उद्धव यांनी दिले आहेत. शिवसेनेच्या नाराज आमदारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावली. शिवसेनेचे विधान परीषदेतील मंत्री शिवसेनेच्याच आमदारांच्या मतदारसंघातील कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आमदारांनी तक्रार केली होती. सत्तेत असुनही शिवसेना आमदारांची कामं होते नाहीत. विशेष करून सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या मंत्र्यांची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती.
 
या बैठकीत नाराज आमदारांचे प्रश्न विभागीय प्रतोदांनी उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांसमोर मांडले. एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्याबद्दल आमदारांच्या तक्रारी नाहीत. मात्र, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्याबद्दल आमदारांच्या तक्रारी असल्याचे प्रतोदांनी सांगितले.
 
त्यावेळी सुभाष देसाई यांनी त्यांचा कार्य अहवाल मांडला. दिवाकर रावते यांनी देखील स्वतःची बाजू मांडली.
मंत्री आणि प्रतोद याच्यासोबत समोरासमोर चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्व कामं त्यांच्या विभागीय प्रतोदांकडे देण्यास सांगितले.