शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनेचा दसरा मेळाव होणार शिवाजी पार्कवर

मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. शिवाजी पार्कवर पावसानं खूप मोठा चिखल झाला होता. आणि तो थांबत नसल्याने मैदान तयार कसे करावे आहा मोठा प्रश्न होता मात्र आता पाऊसाने  विश्रांती घेतल्यामुळे यंदाचा दसरा मेळावा  होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
शिवसेनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यानं दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याचीही उत्सुकता आहे. शिवाय येत्या चार महिन्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मेळाव्याकडे विशेष लक्ष असेल. तर हा  बाळसाहेब ठाकरे  यांचा वारसा आणि ओळख असेलेला  हा दसरा मेळावा  11 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता सुरुवात होईल. या करिता  अनेक गोष्टी उभारणे सुरु असून   भव्य असे  व्यासपीठ ही उभारले जाणार आहे.
 
नवरात्रीचे व्रत करणारे भक्त नवमीच्या दिवशी कुमारीकाना भोजन देऊन व्रत पूर्ण करत असतात. दोन वर्षांच्या बालिकेला कुमारी, त्यापेक्षा अधिक व तीन वर्षांपेक्षा लहान -त्रिमूर्ति, त्यापेक्षा अधिक व चार वर्षांपेक्षा लहान -कल्याणी, त्यापेक्षा अधिक व पाच वर्षांपेक्षा लहान -रोहिणी, त्यापेक्षा अधिक व सहा वर्षांपेक्षा लहान - कालिका, त्यापेक्षा अधिक व सात वर्षांपेक्षा लहान- चंडिका, त्यापेक्षा अधिक व आठ वर्षांपेक्षा लहान- शांभवी, त्यापेक्षा अधिक व नऊ वर्षांपेक्षा लहान- दुर्गा व दहा वर्षांच्या बालिकेला -सुभद्रा अशा विविध नावांनी संबोधले जाते.