शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 22 ऑक्टोबर 2014 (13:07 IST)

शिवसेनेचे नेते दिल्लीहून रिकाम्या हातांनी परतले

भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्ली दरबारी दाखल झालेल्या शिवसेना नेत्यांची निराशा झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह तसे जे.पी. नड्डा यांची भेट झाली नसल्याचे समजते. शिवसेना नेत्यांची कोणत्या भाजप नेत्याशी चर्चा केली हे मात्र अज्ञाप समजू शकलेले नाही. 
 
महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजने केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात काहीशी भीती निर्माण झा ली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांना तडजोडीसाठी दिल्लीत धाडण्यात आले होते. हे दोघेही पक्षनिरीक्षक राजनाथ सिंह आणि जे पी नड्डा यांना भेटणार असल्याचे वृत्त होते. पण या दोन्ही नेत्यांना त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे भाजप शिवसेनेचे ऐकण्याच्याही मनस्थितीत नाही का असा प्रश्न उभा राहत आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरलेली शिवसेना सत्तेबाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे.