बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनेचे रवींद्र फाटकच ‘ठाणे’दार

ठाणे- ठाणे, पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत अखेर शिवसेनेचेच ‘डाव’ खरे ठरले आहेत. अटीतटीच्या लढतीत शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार रवींद्र ङ्खाटक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा 153 मतांनी पराभव केला आहे. रवींद्र फाटक यांना 602 तर, डावखरे यांना 449 मते मिळाली.
 
सर्व राजकीय पक्षांच्या नेतृत्वाशी उत्तम संबंध ठेवून असलेल्या डावखरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, शिवसेनेने फाटक यांना उमेदवारी देऊन त्यांना धक्का दिला. ठाणे, पालघरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना-भाजपची मते अधिक होती. मात्र, वसई विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी डावखरे यांना पाठिंबा दिल्याने लढत चुरशीची झाली. दोघांचे भवितव्य अपक्षांच्या 72 मतांवर अवलंबून होते. अपक्षांनी आपले वजन फाटक यांच्या पारडय़ात टाकल्याचे निकालातून दिसून आले आहे.