गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 जुलै 2014 (09:02 IST)

शिवसेनेच्या खासदारांवरील आरोप चुकीचे - उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या 11 खासदारांवर चुकीचे आरोप केले जात आहे. आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत परंतु त्याचा अर्थ, आम्ही  अन्य धर्मातील लोकांचा द्वेष करतो असा होत नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचीही प्रतिक्रीया ठाकरे यांनी दिली आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार शिवसेनेच्या खासदारांनी यापूर्वीही केली होती. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केटरिंग सुपरवायझरच्या तोंडात चपाती ठोसण्याचा प्रयत्न केला. संबंधित सुपरवायझर हा मुस्लिम आहे. रमजान महिना सुरु असून त्याचे रोजे सुरु आहे. या प्रकारामुळे त्याचा रोजा (उपवास) मोडल्याचा आरोप होत आहे.  यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. तसेच या घटनेला आता धार्मिक रंग दिला जात आहे.

शिवसेना कधीही इतक्या खालच्या पातळीचेही राजकारण करीत नाही. जे काही करायचे ते थेट आमनेसामने करते. आम्हाला जसा हिदुत्त्वाचा आदर आहे, तसा अन्य धर्माचाही आहे. आमच्या खासदारांनी चुकीचे काहीही केले नाही; असे सांगून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची पाठराखण केली.