शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (14:58 IST)

शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून संजय राऊतांना डच्चू

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्यांमध्ये फेरबदल करण्‍यात  आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रवक्तेपदावरून डच्चू देण्यात आला आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हटवले आहे.
 
यापार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने सहा नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये निलम गोऱ्हे यांना कायम ठेवून अमोल कोल्हे, अरविंद सावंत, अरविंद भोसले, डॉ. मनिषा कायंदे, विजय शिवतारे या नव्या चेहऱयांची प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे.
 
पक्ष प्रवक्ते हे माध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतात. मात्र शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून प्रवक्त्यांची भूमिकाच पक्षाला अडचणीत आणणारी ठरत होती.