गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2015 (07:27 IST)

शेतकरी मेला तरी चालेल पण सावकार-व्यापारी जगला पाहिजे

भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये शेतकरी देशोधडीला लागत आहे. शेतकरी मेला तरी चालेल पण सावकार आणि व्यापारी जगला पाहिजे, असे या सरकारचे धोरण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवAते नवाब मलिक यांनी भाजप सरकारवर राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
 
यावेळी ते म्हणाले, सरकारने काल केलेल्या करवाढीमुळे पेट्रोल- डिझेलच्या दरामध्ये 2 रुपे वाढ झाली आहे. दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी ही करवाढ केल्याचे सांगितले जात आहे. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याच्या तिजोरीत झालेला खडखडाट दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. एकीकडे सावकारांना कर्जमाफी द्यायची परंतु शेतकर्‍यांना कोणत्याही स्वरुपाची मदत जाहीर करायचे नाही, असे सरकारचे चुकीचे धोरण आहे. या सरकारकडून फक्त सावकार आणि व्यापारी वर्गाला खूश ठेवण्याचे काम केले जात असून शेतकरी वर्गाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.