गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 1 एप्रिल 2015 (14:22 IST)

श्रीकर परदेशी यांची पंतप्रधान दरबारी वर्णी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्त या नात्याने अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविणारे आणि मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाचे महानिरीक्षकपदाची जबाबदारी पेलताना तितक्याच सक्षमपणे पीएमपी बससेवा ‘ट्रॅक’वर आणणारे कर्तव्यदक्ष अधिकारी  श्रीकर परदेशी यांची दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी बढती देण्यात आली आहे.

परदेशी यांच्या कामाची दखल आता थेट केंद्र सरकारने घेतली असून केंद्र सरकारने त्यांची पंतप्रधान कार्यालयातील उपसचिवपदी नियुक्ती केली आहे. ते २००१ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. नांदेड मुख्याधिकारी, पुणे आयुक्त, मुद्रांक व नोंदणी विभागाचे महानिरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवर काम केल्यावर परदेशी यांनी थेट दिल्ली गाठली आहे.