बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 30 जुलै 2016 (15:15 IST)

संस्कार भारती "भक्तिगीतगायन स्पर्धे"चा बक्षिस समारंभ

महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांच्या ९०व्या जयंती प्रित्यर्थ 'संस्कार भारती,मुंबई महानगर' आणि 'माणिक वर्मा प्रतिष्ठान' आयोजित भक्तिगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना राणी वर्मांच्या हस्ते बक्षिस प्रदान कार्यक्रम दि. ६ ऑगस्ट २०१६ रोजी सायं. ५ वा. महाराष्ट्र सेवासंघ, मुलुंड प. येथे होणार आहे. यावेळी विजेत्या स्पर्धकांच्या गीतगायनाचा आस्वाद घेऊन नवोदित गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे अशी विनंती महानगर प्रमुख माधुरी शेंबेकर यांनी केली आहे.