शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 7 एप्रिल 2016 (12:19 IST)

सतीश शेट्टी हत्या: भाऊसाहेब आंधळकरांना अटक

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना अटक केली आहे.  आंधळकर यांनी पोलिस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.

सतीश शेट्टी यांनी माहिती अधिकार कायद्याच्या मध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले होते. 2पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील काही जमिनी आयआरबीने बळकावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 1भंडारी हॉस्पिटल समोर सतीश शेट्टी यांची अज्ञातांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. भाऊसाहेब आंधळकर हे या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी होते.

त्यांनीच गुंड श्याम दाभाडे याच्यासह पाच जणांना सतीश शेट्टी यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. मात्र आंधळकर आणि त्यांचे सहकारी तपासामध्ये दिशाभूल करत असून ते खऱ्या आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप सतीश शेट्टी यांचा भाऊ संदीप शेट्टी यांनी केला होता.