शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 2 जुलै 2014 (11:24 IST)

सरकारी डॉक्टर संपावर;कारवाई होणार-आरोग्यमंत्री

वैद्यकीय अधिकार्‍यांनी विविध मागण्यासाठी पुकारलेल्या  बेमुदत संपामुळे मुंबई वगळता राज्यात आरोग्य सेवेस फटका बसला  आहे. संपावर गेलेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेव कायद्यानुसार (मेस्मा) कारवाई करण्यात येईल  असा इशारा आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिला आहे.

पूर्वलक्षी प्रभावाने वेतनाचा लाभ, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 62  करावे, आठ तास काम, साहावा वेतन आयोग जानेवारी 2006  पासून लागू करावा अशा मागण्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी केल्या  आहेत. राज्यातील सुमारे पाच हजार 310 डॉक्टर या संपात  सहभागी झाले आहेत. परिणामी चार हजार प्राथमिक आरोग्य   केंद्रातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. दररोज सुमारे चार ते पाच  हचार रुग्णांवर उपचार केले जातात. डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य  सेवा ठप्प झाली आहे.

डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करत आहे.  डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन सुरेश शेट्टी यांनी केली  आहे. तसेच डॉक्टरांनी संप मागे न घेतल्यास त्यांच्यावर मेस्मानुसार  कारवाई केली जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत.