शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (17:16 IST)

सर्वाधिक श्रीमंत मुंबईत

केंद्र आणि राज्य सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असतानाच एक आश्चर्यकारक बाब समोर आली असून मागील एका वर्षात भारतात श्रीमंतांची संख्या 1.6 टक्क्यांनी वाढली असून सर्वाधिक श्रीमंत मुंबईत असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासानुसार, ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) देशांपैकी भारतात धनाढय़ांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वेल्थ अँण्ड यूबीएसच्या ताज्या अभ्यासानुसार, ही आकडेवारी समोर आली आहे. या अहवालात भारतातील प्रमुख शहरांची माहिती देण्यात आली आहे जेथे धनाढय़ (अल्ट्रा हाय नेटवर्थ) लोक राहतात. या अभ्यासानुसार, अल्ट्रा हाय नेटवर्थ म्हणजे अतिजास्त पैसा असणार्‍यांमध्ये महिलांची संख्या वाढत आहे. ही संख्या जवळजवळ 16 टक्के आहे. वर्ल्ड अल्ट्रा वेल्थ अहवालानुसार, भारतात जवळजवळ 1250 धनाढय़ महिला आहेत. ज्यांची संयुक्त संपत्ती जवळजवळ 5852.4 अब्ज रुपये आहे.
 
अहवालानुसार, अल्ट्रा हाय नेटवर्थमध्ये जी वाढ झाली आहे, त्यात सरासरी एका व्यक्तीकडे 183 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. या अहवालात भारतात जवळजवळ 103 लोक असे आहेत, ज्यांच्याकडे 6100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.