शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सांगली , गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (14:46 IST)

‘व्हॉटस्’ ‘आॅनलाईन’ आत्महत्या!

शहरात एक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने स्वत:ला श्रद्धांजली अर्पण करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महादेव कुंभार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. महादेव कुंभार याने आत्महत्येपूर्वी स्वत:चे एक पोस्टर तयार करून व्हॉट्सअपवर मित्रांना पाठवले होते.
 
या तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर या विद्यार्थ्याने स्वत:लाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि ते सगळ्यांना शेअर केले. महादेवने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.