शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (10:21 IST)

साईबाबांच्या दर्शनासाठी व्हिआयपी पास

साईबाबांच्या दर्शनासाठी व्हिआयपी पास घेण्यावरून नेहमी वाद होत होते. मात्र आता हे वाद होणार नाही कारण व्हिआयपी पास घेण्यासाठी तुम्हाला कुणाच्या ओळखीची किंवा शिफारसीची गरज नाही. जे पैसे देणार त्या सर्वांना व्हिआयपी पास मिळणार आहे.त्यामुळे पूर्ण भारतातून साईबाबा यांचे दर्शन घेणारया भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
दर्शनासाठी येणा-या ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना रांगेत प्रतिक्षा करावी लागणार नाही. अपंगांना गेट क्रमांक तीनमधून निशुल्क दर्शन दिले जाणार आहे. त्याचबरोबर दर्शनासाठी रांगेत असलेल्या भाविकांना मोफत कॉफी, चहा, दूध व बिस्कीटे देण्याचा निर्णय साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केला आहे. एलईडी स्क्रिनच्या माध्यमातूनही भाविकांना साईबाबांचे दर्शन घेता येईल. मंदिर परिसरत व भक्त निवास गर्दीची स्थळे, बस स्थानक यासारख्या सर्व ठिकाणी एलईडी स्क्रिन लावून भाविकांना साईबाबांचे दर्शन घडवण्यात येईल. यासोबतच संस्थानचे विविध व्यवस्थेचे दर, सोयी-सुविधा यांचीही माहिती त्यावरून देण्यात येणार आहे.
 
यापुढे भाविक दर्शनासाठी रांगेत असतांनाच त्याच्या कपाळी गंध लावून त्याचे स्वागत केले असून , यापुर्वी व्हिआयपी पास मिळवण्यासाठी शिफारस लागत असे आता ती लागणार नाही. आधीच्या नियमामुळे ठराविक भाविकांनाच व्हिआयपी पास मिळायचे आता जे भाविक पैसे भरतील त्या सर्वांना पास मिळणार आहे, अशी माहिती संस्थानने दिली.