शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सावधान...एक्स्प्रेस वेवर 'ड्रोन'द्वारे लक्ष

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आता ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जाणार आहे.
 
राज्य सरकारने यासंबंधी घोषणा केली होती. एक्स्प्रेस-वेवर लेनची शिस्त मोडणाऱ्यांसह अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर, चुकीच्या पद्धतीन ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता चोवीस तास ड्रोनची नजर राहणार आहे. रस्ते विकास महामंडळ, ‘आयआरबी’च्या वतीने एक्स्प्रेस-वेवर चार ठिकाणी ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांविरोधात कारवाईही करण्यात आली.