बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी फ. मु. शिंदेंचा अर्ज दाखल

सासवड येथे होणार्‍या 87 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्क्षपदासाठी ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे आणि लेखक संजय सोनवणे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. पहिल्या दिवशी दोन अर्ज आले आहेत. ज्येष्ठ कवी शिंदे म्हणाले की, पुण्याप्रमाणेच औरंगाबाद शाखेतून आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. या आधी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. पण तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. ग. जाधव यच्यासाठी माघार घेतली.24 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.