गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शनिवार, 20 सप्टेंबर 2014 (16:03 IST)

सिंचन घोटाळा: राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी होणार

बहुचर्चित सिंचन मंडळातल्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी होणार आहे. सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची नेमकी भूमिका काय होती? याबाबत चौकशी करण्यासाठी राज्याच्या गृहखात्याने एसीबीला परवानगी दिली आहे. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. राष्‍ट्रवादी विरूद्ध मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असे चिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यासोबत काम करायचे नाही, अशी टीका केली होती. त्यामुळे या हलचाली झाल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या चौकशीला हिरवा कंदिल दाखवल्याने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित प्रकरणाची फाईल ही राज्याच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयात पाठवण्यात आली असून तिकडून ती मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजुरीसाठी जाईल.